जिंदगी आणि बरंच काही....
कधीतरी कुठेतरी थांबायचं असतं
एक घोट विसाव्याचा
क्षणभर प्यायचा असतो....
तरी कधी आपण खूप करतो घाई
मग ठसका आला
कि कुठेतरी चुकतो हे भासतं जणू काही
वेळ आहे भरपूर
हे तुम्हीच तुमचं ठरवता
हे ठरवताना मात्र वेळ खूप गमवता .....
जगणं असतं का हो
सेकंदाचं,मिनिटाचं, तासाचं ....
तो खुळाच मी समजेन जो जगणं मोजत बसला .....
जिंदगी, life , आयुष्य , etc
काय काय याला म्हणतात
थोडं थांबावं ..... आणि बरंच काही आहे
हे उलघडून नक्की पाहावं
~भक्ती मोरे
No comments:
Post a Comment